नाशिक : ओझरसह परिसरात रामनवमीचा उत्साह

नाशिक : ओझरसह परिसरात रामनवमीचा उत्साह

Published on

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा 

नाशिक शहरासह जिल्हाभरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. नाशिकच्या ओझर येथेही मोठ्या उत्साहात रामनवमी निमित्त प्रभु श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मेनरोड वरील काळा राम मंदिरात भरत रासणे व साथीदारांनी सुमधूर आवाजात गीत रामायणाचे गीते सादर केली. 

साडेबारा वाजत श्रीराम की जय च्या निनादात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळेस भक्तांनी मोठी गर्दी केली होती. हनुमान चौकातील गोराराम मंदिरात देखील रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news