नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे पाेलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी (दि.8) जिल्ह्यातील २९ पाेलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या केल्या. बहुतांश पाेलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने या अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्याचे समजते.
पोलिस अधीक्षक उमाप यांनी दिलेल्या आदेशानुसार, ओझर विमानतळ सुरक्षेची जबाबदारी असलेले अशोक पवार यांची पिंपळगाव बसवंत, नियंत्रण कक्षातील बिपीन शेवाळे यांची त्र्यंबकेश्वर, बापू महाजन यांची निफाड, राजेंद्र कुटे यांची सिन्नर, श्याम निकम यांची सिन्नर एमआयडीसी, पांडुरंग पवार यांची येवला तालुका, नंदकुमार कदम यांची येवला शहर, पंढरीनाथ ढोकणे यांची छावणी (मालेगाव), जयराम छापरिया यांची किल्ला (मालेगाव), शिवाजी बुधवंत यांची मालेगाव शहर, दौलत जाधव यांची आझादनगर (मालेगाव), तर सहायक निरीक्षक गणेश म्हस्के यांची हरसूल पाेलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. तर रमजानपुरा पाेलिस ठाण्याचे बाळासाहेब थोरात यांची मनमाड, अर्ज शाखेतील कैलास वाघ यांची चांदवड, दोषसिद्धी शाखेतील यशवंत बाविस्कर यांची रमजानपुरा, चांदवडचे समीर बारावकर यांची देवळा, दिंडारी पाेलिस ठाण्याचे चेतन लोखंडे यांची वावी, सुरगाण्याचे सहायक निरीक्षक नीलेश बोडके यांची वणी, देवळ्याचे सहायक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांची जायखेडा, तर आयेशानगर पाेलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मनोज पवार यांची वडनेर खाकुर्डी पाेलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
काहींना 'नियंत्रणा'त, तर काही प्रतीक्षेत
इगतपुरी पाेलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पाेलिस निरीक्षक वसंत पथवे आणि ओझर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अशोक रहाटे यांनी कामकाजात गंभीर कसूर केल्याने त्यांची आडगाव येथील पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे, तर नियंत्रण कक्षातील वरिष्ठ पाेलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांची ओझर आणि राजू सुर्वे यांची इगतपुरी पाेलिस ठाण्याच्या वरिष्ठ पाेलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाेलिस निरीक्षक संदीप रणदिवे, अनिल भवारी, दिगंबर भदाणे, सहायक निरीक्षक प्रल्हाद गिते, सागर कोते यांच्याही बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्र काढण्यात येणार आहेत.
हेही वाचा :