पाथर्डी : विरोधकांचा अपप्रचार खोडून काढा : आ. मोनिका राजळे | पुढारी

पाथर्डी : विरोधकांचा अपप्रचार खोडून काढा : आ. मोनिका राजळे

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहेत. केंद्र सरकारच्या आठ वर्षातील व राज्य सरकारच्या सात महिन्यातील विविध कल्याणकारी योजनांची व विकास कामाची महिती भाजपा पदाधिकारी बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, विस्तारक, युवा मोर्चाचे कार्यकर्ते यांनी शहरातील, गावातील, वाड्या वस्त्यावरील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवुन विरोधकांचा सरकारविरोधी खोटा व दिशाभुल करणारा प्रचार खोडून काढावा, असे अवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

प्रदेश भाजपच्या सुचनेवरून बुथ सशक्तीकरण अभियानाअंतर्गत पाथर्डी मंडल बैठक आमदार राजळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, गोकुळ दौंड, धनंजय बडे, अमोल गर्जे, अजय भंडारी, विष्णुपंत अकोलकर, पुरुषोत्तम आठरे, रवींद्र वायकर, काकासाहेब शिंदे, सुनील ओव्हळ, प्रवीण राजगुरू, नामदेव लबडे, सचिन वायकर, भगवान आव्हाड, नारायण पालवे, संभाजी गर्जे, उद्धव माने, शिवनाथ मोरे, नवनाथ धायतडक, काशीताई गोल्हार, मंगल कोकाटे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आ.राजळे म्हणाल्या की, पुढील वर्ष दीड वर्षात पंचायत समितीपासून विधानसभा, लोकसभापर्यंत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यानी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मागेल त्याला शेततळे, स्वच्छ भारत अभियान, उज्वला गॅस योजना, जलयुक्त शिवार,आनंदाचा शिधा, मोफत रेशन, जलजीवन मिशन, शासकीय नोकरभरतीसाठी वाढविलेली वयोमर्यादा यासह इतर योजनांची महिती सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Back to top button