Nashik : मंजूरटंचाईवर आधुनिक तंत्रज्ञानाने मात

Nashik : मंजूरटंचाईवर आधुनिक तंत्रज्ञानाने मात

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

वाढती मजुरी व मजूरटंचाई यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी शेतीमध्ये सुधारित यंत्रांचा वापर वाढवल्याचे दिसून येत आहे.
सव्वा ते दीड तासात एक माणूस यंत्राद्वारे एकरभर मका पेरणी करू शकतो, त्यामुळे वेळेची बचत व मजुरी वाचते. तालुक्यातील सावकी (विठेवाडी) या गिरणा नदीकाठावरील प्रगतिशील शेतकरी धनंजय बोरसे यांनी सुधारित यंत्राच्या सहाय्याने मक्याची पेरणी सुरू केली आहे. चणकापूर धरणातून सध्या गिरणा नदीला शेवटचे आवर्तन सोडलेले असल्याने

नदीकाठच्या विहिरींना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. लोहणेर, सावकी, विठेवाडी, भऊर, खामखेडा परिसरारातील शेतकऱ्यांनी शेत भिजवून खरीप हंगामातील मका पेरणीला सुरुवात केली आहे. नदीकाठावरील बहुतांश शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही प्रमाणात मका पेरणी केली आहे. मका पेरणीसाठी मजुरांची आवश्यकता असते. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली मजुरी व मजूरटंचाई यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.

कांदालागवड, मका, बाजरीची पेरणी असो की काढणी तेव्हा मजूरटंचाई भासते. त्यात वाढती मजुरी यामुळे शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तेव्हा आधुनिक तंत्रज्ञान क्रमप्राप्त ठरते.
कुबेर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटन

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news