Jackie Shroff's wife Ayesha Shroff
Jackie Shroff's wife Ayesha Shroff

Ayesha Shroff Cheating Case | अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नीची फसवणूक; गुन्हा दाखल

Published on

पुढारी ऑनलाईन : अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी फसवणूक झाल्याची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अ‍ॅलन फर्नांडिसविरुद्ध या व्यक्तीविरूद्ध मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी अ‍ॅलन फर्नांडिसने ५८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची दखल घेत, संशयित आरोपी अ‍ॅलन फर्नांडिसविरूद्ध आयपीसी कलम ४२०, ४०८, ४६५, ४६७ आणि ४६८ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंबई पोलिस करत आहेत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news