Instagram Down : इन्स्टाग्राम डाऊन; ‘इतक्या’ युजर्सनी केल्या तक्रारी | पुढारी

Instagram Down : इन्स्टाग्राम डाऊन; 'इतक्या' युजर्सनी केल्या तक्रारी

पुढारी ऑनलाइन डेस्क : Instagram Down : फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठीचे प्लॅटफॉर्म असेलेले लोकप्रिय इन्स्टाग्राम अॅप डाऊन झाले आहे. आउटेज ट्रॅक करणाऱ्या साइट डाउनडिटेक्टरने याची पुष्टी केली आहे. डाउन डिटेक्टर साइटने म्हटले आहे, 9:20 PM EDT पासून इन्स्टाग्रामला समस्या येत आहे, असे वापरकर्त्यांच्या अहवालातून सूचित होते. तुम्हालाही समस्या येत असेल तर https://t.co/lXKoHvktSg वर जा आणि RT #Instagramdown करा, असे म्हटले आहे.

एका अहवालाप्रमाणे 56 टक्के वापरकर्त्यांना (युजर्स) इन्स्टाग्राम वापरताना समस्या येत आहेत. तर 23 टक्के यूजर्सला लॉग इन करताना अडचणी येत आहेत तर 21 टक्के यूजर्सना सर्वर एरर दाखवत आहे. याशिवाय इन्स्टाग्राम डाऊन असल्याचे मिम्स देखील व्हायरल करण्यात आले आहे. Instagram Down इन्स्टाग्रामच्या युजर्सने ट्विटरवर शिफ्ट होत इन्स्टाग्राम डाऊन असल्याचे वेगवेगळे मिम्स व्हायरल केले आहेत.

काहींनी इन्स्टाग्रामवर राग व्यक्त केला आहे. तर काहींनी इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने लोक ट्विटरवर पळत आहेत असे मिम्स ट्विटरवर केले आहे. एका युजरने म्हटले आहे, इन्स्टाग्राम नेहमीच डाऊन होते. मी याला वैतागले आहे.

संबंधित बातम्या

 

दरम्यान, इन्स्टाग्राम डाऊन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यातही इन्स्टाग्राम डाऊन झाले होते. गेल्या महिन्यात 21 मे रोजी इन्स्टाग्रामला एका टेक्निकल बगमुळे इन्स्टाग्राम डाऊन झाले होते. त्यामुळे त्यावेळी 1 लाख 80 हजार युजर्स प्रभावित झाले होते.

हे ही वाचा :

Manipur Violence : इंटरनेट बंदीसंदर्भातील याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन पीएम मोदींना भेटले, जाणून घ्या काय झाली चर्चा

Back to top button