नाशिक : महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार ; कोणत्या नव्या घोषणा ?

नाशिक : महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार ; कोणत्या नव्या घोषणा ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे तसेच चालू आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक आयुक्त कैलास जाधव सोमवारी (दि. 7) स्थायी समितीकडे मान्यतेसाठी सादर करणार आहे. महापालिकेचे दायित्व अडीच हजार कोटींवर गेल्याने नव्या अंदाजपत्रकातील नवीन विकासकामे तसेच प्रकल्पांवर परिणाम होणार आहे.

स्थायी समितीची मुदत दि. 28 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे. खरे तर फेब—ुवारी अखेर अंदाजपत्रक स्थायीकडे सादर होत असते. मात्र, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागरचना जाहीर झाल्याने मनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजपने अंदाजपत्रक सादरीकरणाची प्रक्रिया लांबणीवर पडू नये यासाठी प्रशासनाकडून पंधरा दिवस आधीच अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मनपा आयुक्त कैलास जाधव स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांच्याकडे अंदाजपत्रक सादर करतील. ऑनलाइन पद्धतीने अंदाजपत्रकीय सभा होत आहे.

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत घरपट्टी, पाणीपट्टीची अपेक्षित वसुली झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने अंदाजपत्रकात दर्शविण्यात आलेल्या उत्पन्नात तूट निर्माण झाली आहे. एकीकडे उत्पन्न कमी होत असताना मोठ्या प्रमाणात विकासकामांना मंजुरी देण्यात आल्याने मनपाच्या दायित्वात मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे. 434 कोटींचे रस्ते विकास योजना, 250 कोटींचे उड्डाणपूल या कामांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात मनपा प्रशासनाने 2105 कोटी रुपयांचे उत्पन्न गृहीत धरले होते. परंतु, डिसेंबर 2021 अखेर केवळ सुमारे 1200 कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. सुमारे 400 कोटींची महसुलात तूट निर्माण झाली आहे.

'बिटको'साठी 25 कोटींची तरतूद!
नाशिकरोड येथील नूतन बिटको रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. त्याकरता 25 कोटींची तरतूद करण्यात येणार असून, चालू आर्थिक वर्षात मोठी तूट निर्माण झाल्याने 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये उत्पन्नवाढीसह थकबाकी वसुलीचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news