

लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर काम करत असतांना सोमवारी पहाटेच्या सुमारास टॉवर वॅगन ट्रेनच्या धडकेत रेल्वे कर्मचारी संतोष भाऊराव केदारे, दिनेश सहादु दराडे, कृष्णा आत्मराम अहिरे, संतोष सुखदेव शिरसाठ या चारही कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. युनियनकडून त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्यात आली आहे.
त्यांच्या परिवाराला सहाय्य करण्याच्या दृष्टीकोनातून नॅशनल रेल्वे मजदूर, युनियन मध्य रेल्वे तथा कोंकण रेल्वेचे महामंत्री आणि ए. आय.आर एफचे सहायक महामंत्री कॉ.वेणू पी नायर यांनी चारही कुटूबियांच्या निवासस्थानी जावून सांत्वन करून प्रत्येकी एक एक लाख रुपयांचे धनादेश देऊन मदत केली.
यावेळी भुसावळ मंडळ सहायक सचिव इस्रार खान, मनमाड शाखा सचिव अंबादास निकम, मनमाड शाखा अध्यक्ष शबरीश नायर, अशोक खंबायत, रमेश केदारे, उत्तम गांगुर्डे, दीपक पगारे, सनी पाठक, सुरेश पगारे, भाऊराज आंधळे, संदीप सोनवणे, किरण शिंदे, विशाल उगले, राहुल झाल्टे, दिपक झाल्टे, सागर खंडांगले, निलेश सोनवणे, भूषण लहरे आदी कामगार उपस्थित होते.
हेही वाचा :