नाशिक : कोटंबी घाटात मालवाहु ट्रक उलटला ; चालक ठार

घाटातील अपघातग्रस्त मालट्रक
घाटातील अपघातग्रस्त मालट्रक

नाशिक : (पेठ) पुढारी ऑनलाइन 
आज पहाटेच्या सुमारास गुजरात राज्याकडून मुंबईकडे जाणारा मालवाहतूक ट्रक क्रमांक के. ए ३२ डी. ८३९६ हा कोंटबी घाटातील अवघड नागमोडी वळणावर संरक्षक कठडे तोडुन उलटला. हा अपघात एवढा भयावह होता की, मालट्रकचा सांगाडा पुर्ण वेगळा होवून वाहनाचे दोनभाग झाले. यात वाहन चालक अमरीश शारमता (३२) रा.गुलबर्गा कर्नाटक हा जागीच ठार झाला आहे.

पेठ – नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्ग ८४८ वरील कोटंबी घाटातील अवघड व अपघाती वळणावर वारंवार अपघात घडत असून मृत्यूची व जखमींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. महामार्ग प्रशासन याबाबत सुस्त असून या ठिकाणी कोणतीच उपाय योजना करत नसल्याने कोटंबी व परिसरातील नागरिकांत रोषाचे वातावरण असून याबाबत आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते. याबाबत पेठ पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news