बंगळूर : ईमेलद्वारे ७ शाळांना बाॅम्बने उडवून देण्याची धमकी | पुढारी

बंगळूर : ईमेलद्वारे ७ शाळांना बाॅम्बने उडवून देण्याची धमकी

बंगळूर, पुढारी ऑनलाईन : अज्ञातांकडून बंगळूरच्या ७ शाळांना बाॅम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. धमकी मिळल्यानंतर बाॅम्ब शोधक आणि नाशक पथकाने शाळांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. बंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी शुक्रवारी सांगितले की, शहरातील ७ शाळांना ईमेलद्वारे बाॅम्ब उडविण्याची धमकी दिली आहे. पोलीस याचा तपास करत आहेत.

“बंगळूरच्या बाहेरच्या परिसरात असणाऱ्या ४ शाळांना ईमेलद्वारे बाॅम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. आमच्या स्थानिक पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. बाॅम्ब शोधक आणि नाशक पथक शाळांमध्ये पोहोचलेली आहे. ईमेलद्वारे आलेल्या धमकीच्या आधारे आमचे पोलीस तपास करत आहे. जी काही माहिती समोर येईल, ती माध्यमांपर्यंत सांगितली जाईल”, अशी माहिती पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली.

हे वाचा… 

Back to top button