नाशिक : नगरसूलला कालभैरव यात्रा उत्साहात

नगरसूल : कालभैरवनाथ यात्रेत पालखीला खांदा देणारे करिअर अकॅडमीचे कुणाल भगत, जीवन भगतसह भाविक. (छाया: भाऊलाल कुडके)
नगरसूल : कालभैरवनाथ यात्रेत पालखीला खांदा देणारे करिअर अकॅडमीचे कुणाल भगत, जीवन भगतसह भाविक. (छाया: भाऊलाल कुडके)

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा

येथील नांदगाव रोडवरील पुरातन श्री कालभैरव महाराज मंदिरात यंदाही मोठ्या उत्साहाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रोत्सव साजरा झाला. सकाळी गावातून गंगाजल कावडी वाद्य व आतषबाजी तसेच कमांडो डिफेन्स करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शोभायात्रा काढली. कालभैरवनाथ महाराजांचा मुखवटा मिरवणूक गावच्या मुख्य रस्त्याने व चौकाचौकातून निघाली होती. त्यावेळी गावातील प्रत्येक घरातील महिलावर्ग पालखीचे पूजन करून दर्शन घेत होते. मिरवणूक व पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर श्री कालभैरवनाथ यांच्या मूर्तीवर अभिषेक केला. यादरम्यान मंत्रोच्चारात सत्यनारायणाचा महाप्रसाद भाविकांना वाटप केला. संध्याकाळी भाविकांना मनोरंजनासाठी सामाजिक प्रबोधन, तमाशा आयोजित केला. संपर्कासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी सैनिक अनिल सुकदेव वऱ्हे, संचालक कमांडो डिफेन्स करिअर अकॅडमी नगरसूल व उपाध्यक्ष संभाजी बोरसे, सचिव दीपक पैठणकर, सनी जाधव, कुणाल भगत, जीवन भगत, रवींद्र पैठणकर, महेंद्र डवलेसह मंदिराचे मानकरी गणपत त्र्यंबक डवले उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news