नाशिक : इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ई-पासपोर्ट छपाईचा मार्ग मोकळा ; केंद्राची परवानगी

नाशिक : इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ई-पासपोर्ट छपाईचा मार्ग मोकळा ; केंद्राची परवानगी
Published on
Updated on

नाशिकरोड , पुढारी वृत्तसेवा
येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ई-पासपोर्ट छपाई व्यावसायिक तत्वावर लवकरच सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ई पासपोर्ट मशिन खरेदीसाठी जागतिक टेंडर काढण्याकरीता केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 18 मार्चला आयएसपी प्रेस मजदूर संघाला त्याबाबतचे निर्देश मिळाले आहेत. मजदूर संघाचा हा ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. यामुळे प्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून भारताचा पहिला ई पासपोर्ट लवकरच येणार आहे.

चलनी नोटांची छपाई करणा-या करन्सी नोट प्रेसच्या जुन्या मशिनरींच्या जागी नवीन मशिनरी उभारण्यासही सरकारने परवानी दिली आहे. मुद्रांक, धनादेश, मद्याचे सील, पोस्टाची तिकीटे आदींची छपाई करणा-या आयएसपीमध्ये एट कलर शीट फिडींग वेट अॅन्ड ड्राय ऑफसेट प्रिटिंग मशीन, शीट फीडन प्रोग्रामेबल लेजर मायक्रो परफोटींग मशीन, एमआयसीआर चेक प्रिंटींग मशीन (शीटफेड), स्टिचींग मशिन, केसींग मशिन, फिनीशींग मशीन या लवकरच उत्पादनासाठी सज्ज होणार आहेत. त्यामुळे प्रेस सक्षमपणे ई पासपोर्ट छपाई करू शकणार आहे. पासपोर्टला लागणारा पेपर, इन ले आदी साहित्य तयार करण्याबाबतही अर्थ व संबंधित खात्यांबरोबर चर्चा झाली आहे.

खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली 15 व 16 मार्चला मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, उपाध्यक्ष कार्तिक डांगे व प्रविण बनसोडे हे दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांना भेटेले. ई पासपोर्टसाठी लागणा-या मशिनरची आवश्यकता आणि सध्याची परिस्थिती तसेच ई पासपोर्ट मशिन लाईनचे टेंडर काढण्यासाठी येत असलेल्या अडचणी यावर चर्चा केली. याआधी प्रेस मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर, भागवत कराड, पकंज चौधरी, वित्त सचिव अजयशेठ, प्रेस महामंडळाच्या सीएमडी तृप्ती घोष, संचालक एस. के. सिन्हा, अजय अग्रवाल आदींचीही वेळोवेळी भेट घेतली. दोन्ही प्रेसच्या आधुनिकीकरणाबाबत आग्रही मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रेस मजदूर संघाच्या पदाधिका-यांनी दोन्ही प्रेसच्या कामगारांसोबत आनंदोत्सव साजरा केला. कामगारांनी जगदीश गोडसे व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news