नाशिक : देवळा तालुक्यात तीन गट, सहा गण

जिल्हा परिषद नाशिक
जिल्हा परिषद नाशिक

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप गट व गण रचना जाहीर झाली असून, देवळा तालुक्यात तीन गट व सहा गण आहेत. यात पूर्वीच्या वाखारी गटाची रचना खर्डे (वा.) अशी करण्यात आली, तर लोहोणेर गटातील महालपाटणे गणाची रचना खालप अशी करण्यात आली आहे. उमराणे गटात असलेले खडकतळे गाव लोहोणेर गटात समाविष्ट करण्यात आले आहे. याचप्रमाणे दहिवड गण आता मेशी होणार आहे.

गट व गणनिहाय गावे पुढीलप्रमाणे :

लोहोणेर गट- लोहोणेर गण समाविष्ट गावे – लोहोणेर, विठेवाडी, झिरेपिंपळ, भऊर, सावकी, खामखेडा,
खालप गण– महालपाटणे, देवपूरपाडे, डोंगरगाव, खालप, निंबोळा, वासोळ, फुलेनगर, खडकतळे.
उमराणे गट : उमराणे गण – उमराणे, तिसगाव, गिरणारे, कुंभार्डे, सांगवी, वर्‍हाळे, म. फुलेनगर मेशी गण – दहिवड, रामनगर, पिंपळगाव (वा), चिंचवे (नि), मेशी, श्रीरामपूर,
खर्डे (वा ) गट : वाखारी गण – वाखारी, भिलवाडा, गुंजाळनगर, रामेश्वर, खुंटेवाडी, कापशी, भावडे, सुभाषनगर, फुले माळवाडी, विजयनगर.
खर्डे गण – खर्डे, वाजगाव, वडाळे, सटवाईवाडी, मटाणे, कनकापूर, कांचने, वार्शी, हनुमंतपाडा, वरवंडी, माळवाडी, शेरी. याप्रमाणे प्रशासनाने गट, गणांची प्रारूप रचना तयार केली असून, हरकतीनंतर अंतिम रचना निश्चित होऊन आरक्षण सोडत निघणार आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news