नाशिक : आइस्क्रीमचे बील भरण्यावरून एकास टोळक्याकडून मारहाण

नाशिक : आइस्क्रीमचे बील भरण्यावरून एकास टोळक्याकडून मारहाण
Published on
Updated on

नाशिक : आईस्क्रीमच्या बिलाचे पैसे माझ्या मोबाइलमधून का भरले असा जाब विचारणाऱ्यास एका टोळक्याने मारहाण केल्याची घटना दहीपुल परिसरात घडली. अक्षय महेश सानप (२७, रा. घारपुरे घाट) याच्या फिर्यादीनुसार संशयित सोनु झगडे व त्याच्या चार ते पाच मित्रांनी मारहाण केली.

संशयितांनी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर अक्षयकडील मोबाइल हिसकावून आईस्क्रीमचे पैसे भरले. त्यामुळे अक्षयने याचा जाब विचारल्याने संशयितांनी शिवीगाळ करीत त्यास मारहाण केली. यात अक्षयला गंभीर मार लागला. संशयितांनी तेथून पळ काढला असून त्यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news