नाशिक : आरोग्य विद्यापीठात लवकरच डिजीटल अभ्यासक्रम

नाशिक : आरोग्य विद्यापीठात लवकरच डिजीटल अभ्यासक्रम

नाशिक: पुढारी ऑनलाइऩ ; विद्यापीठ आवारात सुरु करण्यात येणा-या महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेस शासनाने मान्यता प्रदान केली असून संशोधनासाठी उत्तम व्यासपीठ मिळणार आहे. डिजिटल स्वरुपातील अभ्यासक्रम विद्यापीठाकडून लवकरच सुरु करण्यात येणार आहे. स्किल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी चालना मिळणार आहे. गुणात्मक दर्जावाढीसाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात विविध उद्दिष्टये आणि नवीन योजना कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरु माधुरी कानिटकर यांनी दिली.

संशोधनासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याने विद्यापीठाचा आगामी अर्थसंकल्प संशोधन व विद्यार्थीकेंद्री असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीचे कुलगुरु  माधुरी कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण व अधिसभा सदस्य बैठकीस उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सचिन मुंबरे यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला तर लेखा अहवाल डॉ. मिलिंद देशपांडे यांनी सादर केला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी या सभेचे संचलन केले.

याप्रंसगी अध्यक्षीय मनोगतात कुलगुरु माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संलग्नित महाविद्यालयांनी संशोधनाला चालना देण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम सुरु करणे शक्य असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news