बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
सध्या पॅसेंजर गाड्या बंद असून, त्या कधी सुरू होणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे. सध्या दोनच एक्स्प्रेस गाड्याना रेल्वेचा प्रवासी पास सुरू असून मे महिन्यापासून टप्प्याटप्याने 9 एक्स्प्रेस गाड्यांसाठी प्रवाशांना रेल्वे पास आणि तिकीट काऊंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
बेळगाव-बंगळूर-बेळगाव आणि चन्नम्मा एक्स्प्रेस मिरज-बंगळूर- मिरज या दोनच गाड्यांना प्रवासी पास आणि जनरल डब्यासाठी तिकीट काऊंटर आणि प्रवासी पास सुविधा सुरू करण्यात आली आहे. इतर एक्स्प्रेसना तिकीट बुक करूनच प्रवास करावा लागत आहे.
आता टप्प्याटप्याने 9 एक्स्प्रेससाठी मे महिन्यापासून रेल्वे प्रवासी पास (सिझनल तिकीट) देण्यात येणार आहे. गोवा- निजामउद्दिन एक्स्प्रेस (क्र.12779) गाडीला 1 जून 2022 पासून प्रवासी पास आणि तिकीट काऊंटर सुरू करण्यात येणार आहे.
यशवंतपूर-निजामुद्दिन (क्र. 12629) एक्स्प्रेससाठी 15 मेपासून तिकीट काऊंटर आणि रेल्वे प्रवासी पास देण्यात येणार आहे. यशवंतपूर-गांधीधाम एक्स्प्रेससाठी (क्र. 22685) 15 मेपासून तिकीट काऊंटर, रेल्वे प्रवासी पास सुरू करण्यात येणार आहे. म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेससाठी (क्र. 12781) 28 मेपासून तिकीट काऊंटर, रेल्वे प्रवासी पास सुरू करण्यात येणार आहे. यशवंतपूर-जोधपूर एक्स्प्रेससाठी (क्र.16534) 4 जुलैपासून तिकीट काऊंटर, रेल्वे प्रवासी पास सुरू करण्यात येणार आहे. बंगळूर-जोधपूर (क्र. 1608) 30 जून, यशवंतपूर अजमेर (क्र.1632) 2 जुलै, गांधीधाम-बंगळूर (क्र. 16065) 10 जून आणि म्हैसूर-दादरसाठी 2 मेपासून तिकीट काऊंटर आणि रेल्वे प्रवासी पास सुरू करण्यात येणार आहे.