नाशिक : पालकमंत्री सोमवारी घेणार जिल्हा परिषदेचा आढावा

नाशिक : पालकमंत्री सोमवारी घेणार जिल्हा परिषदेचा आढावा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय कारकीर्द सुरू झाल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वी नाशिक महापालिकेचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता जिल्हा परिषदेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ हे सोमवारी (दि. 30) मुख्यालयात येणार आहेत.

नाशिक महापालिकेच्या कामकाजासंदर्भात तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ना. भुजबळ यांनी 15 दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयात बैठक घेत विविध कामांचा आढावा घेतला. विकासकामांचा आढावा घेताना, माहिती घेण्याऐवजी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीवरच प्रश्न उपस्थित करून कामांची झाडाझडती घेतली. यावेळी आयुक्तांसह बांधकाम, नगररचना, प्रशासन उपआयुक्त, अतिक्रमण निर्मूलन आदी विभागांच्या अधिकार्‍यांची गाळण उडाली.

त्यानंतर महापालिकेच्या कामकाजात सुधारणा होऊन एका दिशेने काम होण्याबरोबरच महापालिकेवर सरकारचा वचक असल्याचा संदेश गेला. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कामांचाही लेखाजोखा घ्यावा, अशी मागणी होती. त्यानुसार येत्या सोमवारी (दि. 30) जिल्हा परिषद मुख्यालयात विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भुजबळ सकाळी 11 वाजता बैठक घेणार आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news