नाशिक : गावठी कट्टा बाळगणारा गजाआड

नाशिक : गावठी कट्टा बाळगणारा गजाआड
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गावठी कट्टा व काडतूस बाळगणाऱ्या संशयिताला दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने ताब्यात घेतले. जयेश उर्फ भोला सुरेश अहिरे (३०, रा. गांधीनगर, उपनगर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

पथकातील अंमलदार विजयकुमार सूर्यवंशी आणि महेश खांडबहाले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक किरण रोंदळे यांच्यासह अंमलदार सूर्यवंशी, मोहन देशमुख, खांडबहाले, संदीप डावरे, विशाल जोशी, मनीषा कांबळे यांनी उपनगर परिसरात सापळा रचून संशयित जयेशला पकडले. त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे आढळली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जयेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news