नाशिक : देवळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट

नाशिक  : देवळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देवळा तालुक्यात रविवारी (दि.9) सलग दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. देवळा शहरासह वाजगाव, खर्डे, कुंभार्डे तसेच उमराणे परिसरातील चिंचवे येथे पाऊस झाला. चिंचवे येथे तुफान तर वाजगाव येथे किरकोळ प्रमाणात गारा पडल्या. यामुळे उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रविवारी देवळा येथे आठवडे बाजार होता. त्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. पिकांनीही माना टाकल्या असून बदलत्या हवामानाचा कांदा व इतर पिकांना चांगलाच फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news