नाशिक : आजपासून विमानसेवा पूर्ववत

नाशिक : आजपासून विमानसेवा पूर्ववत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ओझर विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल, दुरुस्तीच्या कारणास्तव गेल्या 13 दिवसांपासून बंद असलेली विमानसेवा रविवार (दि. 4) पासून पूर्ववत होणार आहेत. सध्या या विमानतळावरून 'स्पाइसजेट'कडून दिल्ली व हैदराबादसाठी सेवा सुरू आहे. लवकरच इतर कंपन्यांच्या सेवाही सुरू व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धावपट्टीच्या देखभालविषयक कामांना गेल्या 20 नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली होती. तेव्हापासून विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, तूर्त स्पाइसजेटकडून हैदराबादसाठी सकाळी 8.10 वाजता, तर दिल्लीसाठी सकाळी 11.20 वाजता विमानसेवा दिली जात आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news