नगर : कॉलेजात घुसून शिक्षकाला मारहाण ; सह्याद्री कॉलेज परिसरातील घटना | पुढारी

नगर : कॉलेजात घुसून शिक्षकाला मारहाण ; सह्याद्री कॉलेज परिसरातील घटना

नगर : पुढारी वृत्तसेवा :  ‘तू हिराशेठ यांचा फोन का उचलत नाही, हिराशेठ यांचे असलेले 11 लाख रूपये दे, असे म्हणत तिघांनी सह्याद्री कॉलेजच्या शिक्षकाला मारहाण केल्याची घटना प्रेमदान हाडको परिसरात (दि.29) घडली. मनोज माधवराव पाटील (रा.प्रेमदान हाडको) असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव असून त्यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी पाच जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत जाधव ऊर्फ हिराशेठ, अनुज कोहिनकर व तीन अनोळखी व्यक्ती अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पाटील हे हेमंत जाधव अनुज कोहिनकर यांची आधीपासून ओळख आहे. 29 नोव्हेंबर रोजी पाटील सह्याद्री कॉलेजच्या ऑफिसमध्ये बसून काम करत असताना तीन अनोळखी इसम तेथे आले. पाटील यांना ऑफिसच्या बाहेर काढून शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.

Back to top button