

नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण कक्षाच्या प्रवेशद्वाराबाहेर बेवारस मृतदेह आढळून आला. अंदाजे ५० ते ६० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह असून, सोमवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.