नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील नांदगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असून त्यामुळे आरोग्य विभागावर दिवसेंदिवस अतिरीक्त कामाचा ताण वाढत आहे.
आरोग्य विभागासाठी तालुक्यात १२८ कर्मचारी पदे मंजूर असुन, सध्यस्थितीत ६० कर्मचारी कार्यरत आहेत. तर एकूण ६८ पदे रिक्त आहेत. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाची सेवा अतंत्य महत्वाची मानली जाते. या विभागामार्फत शहरी भागासह ग्रामीण भागात आरोग्यसेवाही पुरवली जाते. तसेच विभागाच्या माध्यमातून प्रसुतीपूर्व तपासणी, किरकोळ आजारांवर उपचार, माता आणि बाल आरोग्य सेवा, संशयित क्षय, हिवताप, आणि कुष्ठरुग्णांची तपासणी, औषधोपचार आणि आरोग्य शिक्षण अशा अनेक छोट्या मोठ्या आरोग्य सेवा पुरविल्या जातात. परंतु, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे सेवा पुरवितांना अधिकारी कर्मचारी यांची दमछाक होत आहे. त्यामुळे रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.
विभागातील रिक्त पदाचा आहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून, उपलब्ध कर्मचारीवर्गासह कामकाज सुरळीत सुरु आहे. – संतोष जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी, नांदगाव.
तालुका आरोग्य विभाग कर्मचारी पदे आकडेवारी अशी…
तालुका वैद्यकीय अधिकारी :- मंजुर पदे : १ भरलेली पदे : १ रिक्त पदे: निरंक
वैद्यकीय आधिकारी :- मंजुर पदे : १२ भरलेली पदे : ११ रिक्त पदे: १
आरोग्य सेवक पुरुष :- मंजुर पदे : २७ भरलेली पदे : ७ रिक्त पदे: २०
आरोग्य सेविका स्त्री :- मंजुर पदे : ४३ भरलेली पदे : १५ रिक्त पदे: २८
आरोग्य साह्यक पुरुष :- मंजुर पदे : ७ भरलेली पदे : ६ रिक्त पदे: १
आरोग्य साह्यक स्री :- मंजुर पदे : ५ भरलेली पदे : ० रिक्त पदे: ५
औषध निर्मान आधिकारी :- मंजुर पदे : ५ भरलेली पदे : ४ रिक्त पदे: १
आरोग्य पर्यवेक्षक :- मंजुर पदे : १ भरलेली पदे : १ रिक्त पदे: निरंक
कनिष्ठ साह्यक :- मंजुर पदे : ६ भरलेली पदे : ५ रिक्त पदे: १
परिचर :- मंजुर पदे २१ भरलेली पदे : १० रिक्त पदे: ११
एकूण :- मंजुर पदे :- १२८ भरलेली पदे ६० रिक्त पदे ६८