शाहरूख खानवरील कारवाईबाबत ‘कस्टम’चा मोठा खुलासा | पुढारी

शाहरूख खानवरील कारवाईबाबत 'कस्टम'चा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या टीम दुबईहून मुंबईच्या विमानतळावर परतत असताना कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले होते. त्याच्याकडे सुमारे १८ लाखांची महागडी घड्याळे सापडली होती. शाहरूख खान याला ५ लाख रुपये भरल्यानंतर सोडून देण्यात आल्याचे वृत्त प्रसार माध्यमात पसरले होते.  आता कस्टम अधिकाऱ्यांनी याबबातचा मोठा खुलासा केला आहे.

शाहरूख खान आणि त्याच्या टीमकडून कोणताही दंड वसूल केला नसल्याचे कस्टम अधिकाऱ्याने म्‍हटलं आहे. केवळ प्राथमिक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तपासणी करून फक्त परदेशातून आणलेल्या मालाचा चार्ज ( शुल्क ) भरण्यास सांगण्यात आलं होते. परंतु, ५ लाख रूपयांची एवढी मोठी रक्कम दंड म्हणून वसूल केलेली नाही. असे त्यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

यावेळी शाहरुखच्या बॉडीगार्डला खासगी जीए टर्मिनलवरून टी २ टर्मिनलपर्यंत का नेले?, अशी विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा एखाद्या प्रवाशाला ड्युटी किंवा असे कोणतेही शुल्क भरण्यास सांगितले जाते तेव्हा त्याला GA टर्मिनल ते T२ टर्मिनलवर नेले जाते. कारण तेथेच प्रवाशांसाठी ही सुविधा आहेत. यावेळी शाहरूख खान याच्‍याकडे महागडी घड्याळे होती, ज्याची किमंत १७.८६ लाख रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

शाहरुख खान गेल्या काही दिवसांत शारजा बुक फेअर कार्यक्रमासाठी दुबईला गेले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी रात्री मुंबईच्या चार्टर विमान तळावर पोहोचले होते. यावेळी शाहरूख खान याच्‍यासाेबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि बॉडीगार्ड होता. सकाळी १२.३० च्या सुमारास विमानतळाच्या T३ टर्मिनलवर तपासणी केली असता शाहरूखच्या सामानात सुमारे १८ लाख रुपयांची महागडी घड्याळे सापडली. सीमाशुल्क विभागाने या घड्याळांची चौकशी केली असता, ही घड्याळे भारतात आणण्यासाठी शाहरूख खान याने कोणतेही कस्टम ड्युटी भरली नसल्याचे आढळून आले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button