देवळाली कॅम्प : कुत्र्यावर झडप घालताना सीसीटीव्हीत कैद झालेला बिबट्या. 
देवळाली कॅम्प : कुत्र्यावर झडप घालताना सीसीटीव्हीत कैद झालेला बिबट्या. 

नाशिक : देवळालीत बिबट्याकडून कुत्रा फस्त

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा

लहवित व नानेगाव येथे सुमारे 15 दिवसांपूर्वी दोन बिबटे जेरबंद केल्याची घटना ताजी असतानाच, बार्न्स स्कूलजवळील बंगल्यात शुक्रवारी, दि.16 पहाटेच्या सुमारास प्रवेश करीत पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला. बार्न्स स्कूलजवळ राहणारे डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्याने प्रवेश करीत पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. सकाळी कुलकर्णी यांनी हे फुटेज पाहताच वनविभागाला माहिती दिली. बार्न्स स्कूलजवळ वसाहतीबरोबरच शेतकर्‍यांच्या जनावरांचे गोठे आहेत. शिवाय या परिसरात दररोज शेकडो नागरिक सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी येत असतात. मात्र, या भागात बिबट्या फिरत असल्याने वनविभागाने येथे पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news