

पुढारी ऑनलाईन: भारत सरकारच्या मंत्रालये, विभाग, एजन्सी आणि संस्थांमध्ये गट A, B आणि C अंतर्गत 20000 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासंबंधित 17 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करून, अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार ८ ऑक्टोबरपर्यंत यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर आणि 1 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27/30 वयोमर्यादा पूर्ण करणारे उमेदवार या पदांसांठी अर्ज करू शकतात. आयोगाच्या https://ssc.nic.in/ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी SSC CGL अधिसूचना, 2022 ची PDF ही यामध्ये नमूद केलेल्या थेट लिंकवरून (https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_CGLE_17092022.pdf ) डाउनलोड करता येणार आहे. या वेबसाइटवरून थेट एसएससी सीजीएल भर्ती 2022 चा अर्ज भरण्यासाठी पृष्ठावर जाता येईल.