

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इमारतीच्या 13व्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू जाला. मोहंमद नुराणी रज्जाक (19, रा. जेलरोड) असे या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहंमद सिद्धी बिल्डटेक्स या ठिकाणी मंगळवारी (दि. 24) दुपारी काम करीत होता. तो इमारतीच्या 13 व्या मजल्यावर काम करीत होता. त्यावेळी तोल गेल्याने तो 13 व्या मजल्यावरून नवव्या मजल्यावर पडला. त्यात गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.