नाशिक : उपेंद्रनगरला दोघांवर हल्ला | पुढारी

नाशिक : उपेंद्रनगरला दोघांवर हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उपेंद्रनगर येथे सोमवारी (दि.23) रात्री दोघांनी मिळून दोघांवर शस्त्राने वार केल्याची घटना घडली. यात गौरव तुकाराम पेलमहाले (21, रा. पाटीलनगर, सिडको) व शाहरुख मनियार हे दोघे युवक जखमी झाले आहे. गौरवच्या फिर्यादीनुसार संशयित धीरज पुरषोत्तम चौधरी (20) व सौरभ किसन घुगे (23, दोघे रा. सिडको) यांनी कुरापत काढून धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला केला. त्यात गौरव व शाहरुखला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button