नाशिक : दै. ‘पुढारी’चे कादिर पठाण यांना कार्यसन्मान पुरस्कार

नाशिक : ‘दै. पुढारी’चे वार्ताहर कादिर पठाण यांना कार्यसन्मान पुरस्कार प्रदान करताना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर. समवेत मान्यवर.
नाशिक : ‘दै. पुढारी’चे वार्ताहर कादिर पठाण यांना कार्यसन्मान पुरस्कार प्रदान करताना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर. समवेत मान्यवर.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दै. 'पुढारी'चे जुने नाशिक वार्ताहर कादिर पठाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर यांच्या हस्ते कार्यसन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

नाशिकरोडच्या शुभेन्दू सभागृहात पार पडलेल्या सोहळ्यात व्यासपीठावर साने गुरुजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी, पूज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष रतन चावला, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे-पाटील, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश ठोंबरे उपस्थित होते. ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शाह यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोहळ्यात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया क्षेत्रातील 57 व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच 15 सामाजिक संस्थांना गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगलसिंह राणे, लियाकत पठाण, पंकज पाटील, करणसिंग बावरी, अनिरुद्ध पांडे, हर्षवर्धन बोर्‍हाडे, वकार खान, तौसिफ शेख, दिनेश पगारे, वासिम शेख, सचिन जाधव आदींनी परिश्रम घेतले. मंगेश जोशी व शीतल भाटे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news