नाशिक : अबब! सेंट्रल रेल्वेकडे मनपाची थकबाकी | पुढारी

नाशिक : अबब! सेंट्रल रेल्वेकडे मनपाची थकबाकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सेंट्रल रेल्वेचे नाशिक महापालिकेच्या गाळ्यामध्ये तिकीट विक्री केंद्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र या कार्यालयाकडे मनपाचे २६ लाख ९० हजार रुपयांचे भाडे थकलेले आहे. हे भाडे कमी करण्यास मनपाने स्पष्ट नकार दिल्याने सेंट्रल रेल्वे आता आपले कार्यालय गुंडाळण्याच्या तयारीत आहे. 

नाशिक शहरातील प्रवाशांच्या सुविधेसाठी सेंट्रल रेल्वेने रविवार कारंजा येथे तिकीट केंद्र सुरू केले. त्यानंतर हेच कार्यालय तिबेटीयन मार्केटमधील महापालिकेच्या इमारतीत चार गाळ्यांमध्ये आले. या केंद्रामार्फत तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे कायमस्वरूपी तिकीटविक्री केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. मात्र भाडेवाढीमुळे आता हेच कार्यालय बंद करण्याचा निर्णय रेल्वेला घ्यावा लागत आहे. या कार्यालयाकडे २६ लाख ९० हजार रुपये भाडे थकीत आहे. भाडे कमी करण्यासाठी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील मनपाकडे पत्रव्यवहार केला. परंतु, मनपाने प्रशासनाला भाडे कमी करण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button