पिंपरी : दहावी परीक्षेसाठी तयारी पूर्ण | पुढारी

पिंपरी : दहावी परीक्षेसाठी तयारी पूर्ण

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी बोर्डाची परीक्षा गुरुवार, 2 मार्चपासून सुरू होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात दहावीची परीक्षा 46 केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

दहावी बोर्डाची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान घेण्यात येणार आहे. शहरात एकूण 33 हजार 587 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शहरात परीक्षेसंदर्भात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षांत कोणतेही गैरप्रकार घडू नये, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना शाळांकडून सूचित करण्यात आले आहे.

पोलिसांचा बंदोबस्त, भरारी पथक
परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यावर मंडळाने विशेष भर दिला आहे. या वेळी परीक्षा केंद्रांवर देखरेखसाठी महापालिकेचे भरारी पथक आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर पोलिस तैनात असणार आहे.

Back to top button