नाशिक : सीटी बसच्या धडकेत सायकलस्वार ठार

नाशिक : सीटी बसच्या धडकेत सायकलस्वार ठार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर बसने धडक दिल्याने सायकलस्वार ठार झाल्याची घटना बारदान फाटा येथे घडली. गुरुवारी (दि.५) सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला असून त्यात पंडित भागुजी झोले (४९) यांचा मृत्यू झाला.

सागर झोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमएच १५ जीव्ही ८००६ क्रमांकाच्या सीटी बसचालक भरदाव आला व त्याने बारदान फाटा परिरसात सायकलवरून जाणाऱ्या पंडित झोले यांना धडक दिली. या धडकेत गंभीर मार लागल्याने झोले यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक फरार झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news