चिपळुणात 14 गावे, 10 वाड्यांमध्ये पाणीटंचाई | पुढारी

चिपळुणात 14 गावे, 10 वाड्यांमध्ये पाणीटंचाई

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात ठिकठिकाणचे नैसर्गिक जलस्रोत आटू लागले आहेत. विहिरींमध्येही खडखडाट झाल्याने तालुक्यातील 14 गावांतील 10 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्यस्थितीत या वाड्यांना तीन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून या वाड्यांतील जनतेची पाण्यासाठी वणवण सुरू झाली. मार्च महिना उजाडताच चिपळूण तालुक्यातील अडरे-धनगरवाडी, खडपोली-गोकुळवाडी या वाड्यांतून तहसील कार्यालयाकडे टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते. सर्वेक्षणाअंती या दोन्ही वाड्यांना खासगी टँकरद्वारे पाणीपुरठा सुरू करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत गाणे-धनगरवाडी, राजवाडी, कोंडमळी-धनगरवाडी, तिवडी-भटवाडी, कादवड-धनगरवाडी, धनगरवाडी, नांदगाव खुर्द-लोहारवाडी, सावर्डे-धनगरवाडी, ओवळी-धनगरवाडी, टेरव-धनगरवाडी, शिरवली-येलोंरेवाडी, गुढे-कदमवाडी, डेरवण-धनगरवाडी, तळसर-धनगरवाडी आदी गावांना तीन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.भविष्यात टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनारी – बौद्धवाडी, धनगरवाडीसह कुडप, येगाव, रिक्टोली आदी गावांनीही चिपळूण पंचायत समितीकडे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे.

Back to top button