

नाशिक : अज्ञात चोरट्यांनी गोडाऊन फाेडून एक लाखांचे वाहनांचे स्पेअर्स पार्ट लांबविल्याचा प्रकार अशोकस्तंभ परिसरात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्कल सिनेमा कंपाऊंडमधील बॉम्बे मोटार स्टोअर्स फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख १० हजारांचे चारचाकी वाहनांचे वेगवेगळे स्पेअर्स पार्ट चोरून नेले. याप्रकरणी उमेश चंद्रकांत पंढरपूर (५४, रा. इंदिरानगर) यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवकाला सहा लाखांना गंडा
नाशिक : गुंतवणुकीवर नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने युवकाला सहा लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल बापू पाटील (३२,रा. पोकार कॉलनी, दिंडोरीरोड) यांना अल्गो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ५ लाख ७३ हजारांची रक्कम भरण्यास लावून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकूचा धाक दाखवून युवकाला लुटले
नाशिक : चाकूचा धाक दाखवून दोघांनी युवकाला लुटल्याची चुंचाळे शिवारात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तु सखाराम रसाळ (३५, रा. आंबेडकरनगर, वरचे चुंचाळे, अंबड) यांना संशयित नवनाथ साळवे ऊर्फ डॉलर व सुनिल ताठे उर्फ घाऱ्या यांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करत खिशातील सतराशे रूपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटीतून दुचाकीची चोरी
नाशिक : अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची घटना पंचवटी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाषचंद्र मिसरीलाल लोढा (६८, रा. हेरिटेज अपार्टमेंट, चिंचबन रोड) यांची स्वमालकीची दुचाकी (एमएच १७, यु ३१४१) राहत्या इमारतीच्या वाहनतळावरून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :