Opposition Meeting in Mumbai : इंडिया आघाडी म्हणजे 'टोळ्यांचा ग्रुप', मुख्यमंत्री शिंदेंची टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षाची I.N.D.I.A आघाडी नाही तर मध्ये डॉट असल्याने इंडी अलाएन्स आहे. या आघाडीतील लोकांना स्वार्था पलिकडे काही दिसत नाही. प्रत्येकजन त्यांच्या कुटुंबाच्या भल्यासाठी येथे आले आहेत. हे सर्व मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत. विरोधी पक्षांचा हा ग्रुप म्हणजे ‘टोळ्यांचा ग्रुप’ असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कालपासून मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. यावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही टीका केली.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, विरोधी आघाडीच्या तीन बैठका झाल्या परंतु, ते अद्याप स्वत:चा नेता जाहीर करू शकत नाहीत. लोगो देखील एकमताने ठरवू शकत नाहीत, यावरून या आघाडीत किती एकजूट आहे ते समजे, असे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर मत स्पष्ट केले आहे.
देशाप्रती पंतप्रधान मोदी यांना अभिमान आहे. म्हणून देशाचा विकास होत आहे. पीएम मोदी यांच्याकडे देशाची सेवा करण्याचे, देशाची आर्थिक प्रगती करण्याचे आणि देशाला पुढे नेण्याची जबाबदारी आहे. पीएम मोदींच्या कामामुळे विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकलीये असे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: