

नाशिक : पती-पत्नीच्या वादाची कुरापत काढून तिघांनी मिळून एकास मारहाण केल्याची घटना वृंदावन नगर परिसरात घडली. याप्रकरणी अमोल संपत पांडव (३४) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात शारदा पटाईत, रोहित पटाईत, तेजस पटाईत यांच्याविरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे.
संशयितांनी अमोल यांना रविवारी (दि.१८) दुपारी २.३० वाजता मारहाण करीत दुखापत केली. आडगाव पोलिस तपास करीत आहेत.
व्यावसायिक कारणातून काझीपुरा भागात मारहाण
नाशिक : व्यावसायिक कारणातून जमावाने एकास मारहाण करीत दुकानातील साहित्याचे नुकसान केल्याचा प्रकार काझीपुरा भागात घडला. याप्रकरणी वाहिद सिराज शेख (३९, रा. काझीपुरा) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात अशरफ पठाण, जुबेर पठाण, अली पठाण यांच्यासह दोन महिलांविरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे.
संशयितांनी रविवारी (दि.१८) सायंकाळी ५.३० वाजता कुरापत काढून शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. दुकानातील साहित्याचे नुकसान केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :