नाशिक : डांगसौंदाणे येथे गायींची तस्करी करणा-यास अटक

डांगसौंदाने : गुजरात कडून मानूर साल्हेर मार्गे गायींची तस्करी रोखून सोडवणूक केलेल्या गाई.
डांगसौंदाने : गुजरात कडून मानूर साल्हेर मार्गे गायींची तस्करी रोखून सोडवणूक केलेल्या गाई.
Published on
Updated on

नाशिक (डांगसौंदाने ) : पुढारी वृत्तसेवा : 
गुजरातकडून मालेगावकडे कत्तलीच्या हेतूने घेऊन जाणाऱ्या 13 गाईंसह दोन पिकअप व्हॅन आणि एक स्विफ्ट डिझायर असा सोळा लाख 15 हजार रुपयांचे पशुधन गो सेवकांच्या सजगतेने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवार (दि.४) पहाटेच्या दरम्यान गुजरातकडून मानूर साल्हेरमार्गे गायींची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती गो सेवकांना मिळाल्याने त्यांनी सापळा रचला. या मार्गावरील येणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता दोन पिकप व एक स्विफ्ट डिझायर भरधाव त्यांच्या समोरून निघून गेली. या वाहनाचा पाठलाग केला असता थोड्या अंतरावर गाडीचे टायर पंचर झाल्याने चालक पिकप वाहन सोडून पसार झाला. दुसरे वाहन डांगसौंदाणेच्या दिशेने येत असल्याचे गो सेवकांनी भ्रमणध्वनीने पुढे उभी असलेल्या गो सेवकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ततानी गावाजवळ काही तरुणांनी गाडी अडवली असता अंधाराचा व जंगलाचा फायदा घेऊन गाडीचालक व त्याचा साथीदार पसार झाले. वाहनाचा पाठलाग करून अश्फाक अहमद निसार अहमद (38 रा. मालेगाव, ता. मालेगाव) याला पकडण्यात तरुणांना यश आले. सटाणा पोलिस स्टेशनचे डांगसौंदाणे बीटचे हवालदार जगन्नाथ लव्हारे यांना भ्रमणध्वनीने गो सेवकांनी सदर घटनेची माहिती दिली. पोलीसांनी तासाभरात घटनास्थळ गाठले. पोलीस नाईक निवृत्ती भोळे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news