नाशिक : पेट्रोलपंपांवर ठणठणाट, इंधनासाठी वणवण

नाशिक : मालेगावला  पेट्रोलपंपचालकांच्या आंदोलनामुळे कमालीचा इंधन तुटवडा निर्माण झाला असून, जिथे पेट्रोल मिळेल तिथे अशी तौबा गर्दी होत आहे. तर सटाणा येथे दुचाकीतील पेट्रोलही संपले आणि पंपावर ते शिल्लक नाही, अशा बिकट प्रसंगी पंपाबाहेरच विचारात पडलेले एक कुटुंब. तसेच पेट्रोल केव्हा येणार, अशी विचारणा करणारा वाहनचालक.              (छाया: सुरेश बच्छाव/सुदर्शन पगार))

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
सटाणा शहर परिसरात पेट्रोल-डिझेलचा ठणठणाट असून, वैतागलेल्या वाहनधारकांकडून याप्रश्नी तत्काळ तोडगा काढण्याची आग्रही मागणी होत आहे.

शहरासह परिसरातील पेट्रोलपंपांवर सद्यस्थितीत पेट्रोल व डिझेलचा ठणठणाट दिसत असून, बुधवारी (दि. 1) या परिस्थितीचा आढावा घेतला असता मालेगाव रोडवरील सर्व पेट्रोलपंपाचे गेट बंद दिसून आले. साहजिकच यामुळे वाहनधारक वैतागले असून, या कृत्रिम टंचाईविषयी रोष निर्माण होत आहे. केंद्र सरकारने इंधनावरील अधिभार कमी केल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती अचानक कमी झाल्या आणि त्यामुळे पेट्रोलपंपचालकांना आर्थिक नुकसान झाल्याचा गवगवा करीत, पेट्रोलपंपचालकांनी अप्रत्यक्षरीत्या अघोषित असहकार आंदोलन पुकारले आहे. पेट्रोलपंपचालकांकडून मागणीच्या तुलनेत मोजकेच पेट्रोल डिझेल खरेदी करून ते विक्री केली जात आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल उपलब्ध होताच लांबच लांब रांगा लागतात, तर ते संपल्यानंतर मात्र एक – एक, दोन-दोन दिवस इंधनासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ येत असल्याचे चित्र सद्यस्थितीत परिसरातील पेट्रोलपंपांवर दिसून येत आहे. यामुळे वाहनधारक कमालीचे वैतागले आहेत. सद्यस्थितीत लग्नाचा हंगाम सुरू असून, आपापल्या वाहनाने अपेक्षित लग्नस्थळ गाठण्यासाठी पेट्रोल-डिझेलशिवाय पर्याय नाही. परंतु, पेट्रोलपंपावर आल्यावर ते मिळत नसल्याचे पाहून संबंधितांचा कमालीचा हिरमोड होत आहे. प्रसंगी रांगा लावून ताटकळत बसावे लागते. दुसरीकडे मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतला असताना डिझेलची गरज असून, ते मिळत नसल्याने शेतकरीवर्ग त्रस्त बनला आहे. पेट्रोलपंपचालक व कंपन्यांमधील सुंदोपसुंदी दूर करून तत्काळ तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news