राज्यसभा निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवार म्‍हणाले, “राष्ट्रवादीची मते…” | पुढारी

राज्यसभा निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवार म्‍हणाले, "राष्ट्रवादीची मते..."

पुढारी ऑनलाईन : राज्यसभा निवडणूकीत किती उमेदवार रिंगणात उभे राहतात ते पाहू; राजकीय पक्षांच्या आमदारांबाबत घोडेबाजार होण्याची शक्यता नाही. त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्‍वाची ठरणार आहे. राष्ट्रवादीची मतं शिवसेनेच्‍या उमेदवारालाच देऊ, असे आज  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्‍हणाले,  केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारी २019 पासूनची जीएसटी परताव्याची रक्कम येणे बाकी आहे. तीन वर्षांची एकूण थकबाकी सुमारे 29 हजार कोटींहून अधिक आहे. आतापर्यंत 14 हजार 145 कोटी रूपये राज्याला मिळाले असून 15 हजार 502 कोटी रूपयांची रक्कम अद्याप येणे बाकी आहे.

राज्यसभा निवडणूकीबाबत बोलताना ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपला 10 ते 12 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणूकीत अपक्ष आमदारांना विशेष महत्त्‍व आहे. त्यांची भूमिका महत्त्‍वाची असून, राष्ट्रवादीला मते ही  शिवसेनेच्‍या उमेदवाराला दिली जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच कोरोना रूग्णसंख्येत हाेणारी वाढ ही चिंताजनक असून, नागरिकांनी काळजी घ्‍यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हेही वाचलंत का ?

Back to top button