‘अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा’, गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र | पुढारी

'अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा', गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

औरंगाबाद नामांतरणाच्या चर्चा ताज्या असातानाच आता आणखी एका नामांतरणाचा वाद मूळ धरू लागला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. या पत्रात त्यांनी नामांतरणाच्या मागणीसोबत शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे.

‘पवारांनी इव्हेंट केला’

आपल्या पत्रात पडळकर म्हणतात, ‘पवार आजोबा- नातवाच्या मुघलशाहीमुळे अनेक भक्तांना चौंडी येथील दर्शनापासून वंचित ठेवलं. बाँम्बब्लास्टमधील आरोपींसोबत आर्थिक व्यवहार असलेल्या व्यक्ती पक्षात ठेवणार-या शरद पवारांना म्हणजे राजमाता यांची जयंती म्हणजे राजकीय इव्हेंट वाटतो.’ पुढे नामांतरणाबाबत बोलताना ते म्हणतात, ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण हिंदुस्थानच्या प्रेरणास्थान आहेत. मुसलमानी राजवटीत मंदिरं तोडली जात असताना अहिल्यामातेने हिंदू संस्कृतीमध्ये प्राण फुंकत जीर्णोद्धार केला.

संबंधित बातम्या

‘नामांतरण ही जनभावना’

हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून अहिल्यानगर ठेवले जावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना असल्याचं यावेळी पडळकरांनी सांगितलं. यावेळी पत्रात मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत ते म्हणतात, ‘ आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे स्वाभिमानी मुखमंत्री आहात हे सिद्ध करा’ हे त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

हेही वाचा : 

नागपूर : बँकेची पावणेदोन कोटींची फसवणूक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक

कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांना दिलासा

Back to top button