नाशिक : दुचाकी-चारचाकी यांच्यात धडक; तरुण जागीच ठार

नाशिक : दुचाकी-चारचाकी यांच्यात धडक;  तरुण जागीच ठार

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा
सापुतारा – बोरगांव महामार्गावर दुचाकी व चारचाकी यांच्यात जोरदार धडक बसून दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. शनिवारी, दि.10 संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार गुजरात मधील सापुतारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या माळेगांव येथील प्रकाश नारायण बर्डे (२५) व रोहित बाबुलाल राऊत (१९) हे दोघेही कामानिमित्त दुचाकी (क्र. जीजे ०१ जे झेड ९३९६) ने बोरगांव येथे गेले होते. काम आटोपून घरी परतत असताना हतगड किल्ला जवळील संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान वाघदेवा जवळील वळणावर सापुताराकडून बोरगांवकडे येणारी चारचाकी (क्र.एम एच १५ ईबी ९०७८) व दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीवरील प्रकाश बर्डे हा जागीच ठार झाला. तर रोहीत राऊत हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने वासदा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश हा अविवाहित होता. यासंदर्भात सुरगाणा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास बागुल व गोतुरणे हे करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news