नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पुन्हा पेटणार

निफाड : कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीकडे हस्तांतरणाप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, बी. टी. कडलग, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, धनवटे आदी.
निफाड : कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीकडे हस्तांतरणाप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, बी. टी. कडलग, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, धनवटे आदी.
Published on
Updated on

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा बँक प्रशासनाने निफाड सहकारी साखर कारखाना बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीकडे भाडेतत्त्वावर हस्तांतरित केला असून, उद्यापासून सोमवार, दि. 12 कारखान्याच्या मेंटेनन्सला सुरुवात होणार असल्याची माहिती बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा. लि.च्या प्रशासनाने दिली.

बंद पडलेला निसाका भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या निविदा प्रक्रियेत दोन महिन्यांपूर्वी नाशिकची बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनी अव्वल आली होती. दरम्यानच्या काळात कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करून आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यात भाडेकरारनामा झाला. निसाकाने जिल्हा बँकेकडून गेल्या 15 वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने गेल्या 10 वर्षांपूर्वी जिल्हा बँकेने कारखान्याचा ताबा घेतला होता. तेव्हापासून साखर कारखाना बंद होता. कारखाना सुरू होण्यासाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून यापूर्वी अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. परंतु बँकेचे कर्ज असल्याने कारखाना सुरू होण्यास अनेक अडथळे होते. बँक प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी या विषयाची जाहिरात देत टेंडर प्रक्रिया सुरू केली होती. पाच मक्तेदारांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. या प्रक्रियेत नाशिकची बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शनची निविदा प्रक्रियेत अव्वल आल्याने ही निविदा मंजूर करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात जिल्हा बँक प्रशासन आणि बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीने कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करत सोपस्कार पार पाडले. जिल्हा बँक प्रशासन आणि बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यात आज पिंपळगाव येथील रजिस्टर कार्यालयात 25 वर्षांसाठी भाडे करारनामा झाला. करारनामा पूर्ण होताच जिल्हा बँकेने निफाड कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीकडे हस्तांतरित केला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, बी. टी. कडलग, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, धनवटे आदी उपस्थित होते.

दोन दिवसांत डागडुजी :
येत्या दोन दिवसांत कारखान्यामधील यंत्रसामग्रीच्या मेंटेनन्सचे काम सुरू होणार असून, मे महिन्याच्या आत पहिले गाळप घेण्याचा मानस कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे. कारखाना आता सुरू होणार असल्याने ऊस उत्पादकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news