नाशिक: शहरातील चौफुल्याच ठरताय ब्लॅक स्पॉट

ब्लॅक स्पॉट www.pudhari.news
ब्लॅक स्पॉट www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरचीजवळील सिग्नलवर झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर शहरातील ब्लॅक स्पॉट पुन्हा चर्चेत आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश ब्लॅक स्पॉट हे सिग्नल किंवा चौफुलींवरच असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे चौफुलींवरच अनेकांनी अपघातात जीव गमवला असून, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष व वेगावर नियंत्रण नसल्याने सर्वाधिक मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या पाहणीत आढळून आले आहे. शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय, राज्य महामार्गांसह इतर रस्त्यांवर दररोज अपघात होतात. अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना देखील होतात. त्यामुळे अपघातांचे ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी दर तीन वर्षांनी आढावा घेेतला जातो. त्यात ज्या मार्गांवर 500 मीटर क्षेत्रामध्ये सलग तीन वर्षांत पाच प्राणांकित किंवा गंभीर अपघात झाले असतील किंवा 10 व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला असेल त्या अपघातस्थळांना ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जाते. त्यानुसार शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात 23 ठिकाणी ब्लॅक स्पॉट असून, हे सर्व ठिकाणे चौफुलींवरच आढळून आले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी वेगावर अंकुश आणला जातो त्याचठिकाणी सर्वाधिक अपघाती मृत्यू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. पोलिसांच्या पाहणीनुसार या ठिकाणी रात्रीच्या वेळी सर्वाधिक अपघात झाले आहेत.

 शहरातील ब्लॅक स्पॉट असे…
आडगाव ट्रक टर्मिनल, के. के. वाघ कॉलेज, बळीमंदिर चौफुली, जत्रा हॉटेल, तपोवन क्रॉसिंग, द्वारका सर्कल, मिरची हॉटेल सिग्नल, नांदूरनाका सिग्नल, सिद्धिविनायक चौक, सीबीएस सिग्नल, जुना गंगापूर नाका सिग्नल, शरणपूर रोड सिग्नल, कार्बन नाका, उपनगर नाका सिग्नल, फेम सिग्नल, चेहेडीगाव फाटा, दत्तमंदिर सिग्नल, शिंदे गाव, राऊ हॉटेल सिग्नल, तारवालानगर सिग्नल, चेहेडी गाव फाटा, स्वामीनारायण चौफुली, गडकरी चौक सिग्नल.

ब्लॅक स्पॉट म्हणजे काय भाऊ? …

  • दर तीन वर्षांनी आढावा
  • 500 मीटर क्षेत्रात गंभीर अपघात
  • पाच प्राणांकित अपघातांचे ठिकाण
  • 10 जणांचा अपघाती मृत्यू झाल्यास

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news