नाशिक : आदिवासी वस्ती, बंजारा तांड्यावरील ३७ सभामंडपाचे भूमिपूजन

नांदगाव : पिंप्राळे येथे सभामंडप उदघाटनप्रंसगी अंजुम कांदे यांच्या समवेत ग्रामस्थ व पदाधिकारी. (छाया: सचिन बैरागी)
नांदगाव : पिंप्राळे येथे सभामंडप उदघाटनप्रंसगी अंजुम कांदे यांच्या समवेत ग्रामस्थ व पदाधिकारी. (छाया: सचिन बैरागी)

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा
आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून मूलभूत सुविधा (२५/१५) अंतर्गत मतदार संघातील प्रत्येक आदिवासी वस्ती तसेच बंजारा तांड्यावरील सभामंडप मंजूर करण्यात आले आहे. या सभामंडपाचे अंजुम कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

भूमिपूजनप्रसंगी मतदार संघातील एकूण २० गावांमधील ३७ सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गावागावात ढोल ताशांच्या गजरात औक्षण करत गावकऱ्यांनी कांदे यांचे स्वागत केले. भूमीपूजनामुळे आदिवासी बांधव, महिला भगिनींसह आबालवृद्धांच्या चेहर्‍यावर सभामंडपाबद्दल आनंद दिसून आला. आमदार कांदे यांच्या मार्गदर्शनातून मतदार संघात १५० आदिवासी वस्ती तसेच बंजारा तांडा सभागृह उभारण्यात येणार असून, या सभागृहांमध्ये वधू-वर कक्ष तसेच भोजन कक्षाची व्यवस्था देखील असणार आहे. तसेच आमदार कांदे यांनी स्वखर्चातून भगवान वीर एकलव्य तसेच संत सेवालाल महाराज यांच्याकडून भेट दिलेल्या मूर्तींची यामध्ये स्थापना केली जाणार आहे. दरम्यान, अंजुम कांदे यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

आमदार साहेबांच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक तळगळातील नागरीकांपर्यंत विकासकामे पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सर्वांची साथ महत्वाची आहे. येत्या कालावधीत आणखी काही सभामंडपाचे भूमिपूजन करणार आहोत.               – अंजुम कांदे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news