Pandav Nagar murder | श्रद्धा वालकर हत्याकांडाची दिल्लीत पुनरावृत्ती : मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून २२ तुकडे फेकले

Pandav Nagar murder
Pandav Nagar murder
Published on
Updated on

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : श्रद्धा वालकर हत्याकांडातील क्रूरता दिल्लीकर विसरत नाहीत तोच अशाच प्रकारचे आणखी एक हत्याकांड दिल्लीत (Pandav Nagar murder) झाले आहे. अनैतिक संबंधातून पीडित व्यक्तीची हत्या करुन मृतदेहाच्या 22 तुकड्यांची दररोज विल्हेवाट लावण्याचा आरोप मृताच्या पत्नी आणि मुलावरच ठेवण्यात आला आहे. पांडवनगर भागात झालेल्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नी व मुलाला अटक केली आहे.

मृत व्यक्तीचे नाव अंजन दास असे असून आरोपी पत्नीचे नाव पूनम तर मुलाचे नाव दीपक असे आहे. पूनमने पती अंजन यांना झोपेच्या गोळ्या देऊन हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून त्याचे एक एक तुकडे करुन जवळच्या मैदानात तसेच अक्षरधाम परिसरात फेकून दिले. शेजारी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दीपक हातात बॅग घेऊन रात्री उशिरा फिरताना दिसत आहे. तर दीपकच्या मागे त्याची आई पूनम दिसत आहे. मृतदेहाचे तुकडे फेकण्याच्या वेळेचे हे फुटेज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा गुन्हा उघडकीस आला. ज्या फ्रीजमध्ये मृतदेह ठेवण्यात आला होता, तो फ्रीजही पोलिसांनी जप्त केला आहे.

गेल्या मे महिन्यात अंजन दास यांची हत्या करण्यात आली होती. अंजन दास याचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध होते. त्यातून पती—पत्नीमध्ये कलह होत होता. यातूनच बदला घेण्याच्या उद्देशाने पूनमने अंजनची हत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हत्येच्या सहा महिन्यानंतर पूनम व तिच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. (Pandav Nagar murder)

5 जून रोजी पूर्व जिल्ह्यातील रामलीला मैदानात शरीराचे काही अवयव सापडले होते. त्यानंतर पुढील 3 दिवस दोन पाय, दोन मांड्या, एक कवटी आणि एक हात जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती दिल्ली क्राईम ब्रँचचे डीसीपी अमित गोयल यांनी दिली.

दरम्यान, 2016 मध्ये पहिला पती कल्लूचे निधन झाल्यानंतर पूनमने 2017 मध्ये अंजन दासशी लग्न केले. कल्लू दीपकचे वडील होते. मृत अंजनचा विवाहही बिहारमध्ये झाला होता आणि त्याला 8 मुले आहेत. तो कामधंदा करत नव्हता.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news