नाशिक : सोयगाव येथे भैरवनाथ यात्राैत्सव उत्साहात

नांदगाव : भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीचा मान मिळालेले मानकरी किसन देवराम सदगीर. समवेत ग्रामस्थ. (छाया : सचिन बैरागी)
नांदगाव : भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीचा मान मिळालेले मानकरी किसन देवराम सदगीर. समवेत ग्रामस्थ. (छाया : सचिन बैरागी)

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
देवस्थान म्हणून प्रसिद्ध आसलेले तालुक्यातील सोयगाव येथे गुरुवार (दि.13) भैरवनाथ महारांजाची यात्रा उत्सव सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील उत्साहात पार पडली. 'बोल भैरवनाथ महाराज की जय' अशा जयघोषाने सोयगावचा संपूर्ण परीसर दुमदुमून गेला होता.

सकाळी भैरवनाथ महाराज मूर्तीपूजा आभिषेक करण्यात आला. त्यानंतर गावातील सत्यनारायण महापूजा पार पडली. भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीची सुशोभित करण्यात आलेल्या बैलगाडीच्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या वर्षीचे रथाला जोडण्यात आलेल्या बैल जोडीचे मानकरी किसन देवराम सदगीर यांना मिळाला होता. गावातील युवकांनी कोपरगाव येथून गंगा जलाची कावड आणली होती. तर यात्रेच्या निमित्ताने गावात, पाळणे, खेळणी यांच्यासह मिठाईचे दुकाने देखील सजली होती. यात्रेनिमित्त भैरवनाथ महारांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती. यात्रेनिमित्ताने सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या भाविकांसाठी सोयगाव ग्रामस्थांच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन केल्याने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रेसाठी भैरवनाथ महाराज मंदिरांची रंगरगोटी सजावट करत आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण मंदिर परिसर दैदिप्यमान झाला होता.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news