नाशिक : एसबीआय अधिकारी भासवून एटीएम फोडण्याचा प्रयत्न

नाशिक www.pudhari.news
नाशिक www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा : सिडको स्टेट बँक ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवत एटीएममधून रोकड लंपास करण्याच्या तयारीत असलेल्या संशयितासमोर असली एसबीआय अधिकारी आल्याने त्याची चांगलीच धांदल उडाली. वेळ पाहून पळून जातानाच परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर परिसरात हा प्रकार शनिवारी (दि. 28) दुपारी घडला. स्वामी विवेकानंदनगर भागात एका शॉपमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. ते एटीएम फोडून त्यातील रोकड लंपास करण्याच्या उद्देशाने संशयिताने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी संबंधित व्यक्ती संशयास्पद कृत्य करीत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यावेळी नागरिकांनी त्याला, तुम्ही काय करता, अशी विचारणा केली असता, त्याने मी स्टेट बँक ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकही शांत झाले. परंतु काही क्षणांतच त्या ठिकाणी एटीएम मशीनमध्ये रोकड भरण्यासाठी खरेखुरे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आले. त्यावेळी संशयिताने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे व सहकार्‍यांनी पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news