नाशिक : काश्मिरी पंडित हल्ल्याविरोधात नाशिकमध्ये सेनेचे आंदोलन

पंचवटी : पंचवटी कारंजा येथे काश्मिरी पंडितांच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आंदोलन करताना शिवसैनिक. (छाया: रविंद्र आखाडे)
पंचवटी : पंचवटी कारंजा येथे काश्मिरी पंडितांच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आंदोलन करताना शिवसैनिक. (छाया: रविंद्र आखाडे)
Published on
Updated on
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
काश्मीरमधील हिंदू पंडीतांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात शिवसेनेच्या वतीने नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आणि अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला 'जोडो मारो' आंदोलन करण्यात आले. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याचीही यावेळी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले की, गेल्या अनेक दिवसांपासून पुन्हा एकदा काश्मीरमधील हिंदू पंडीतांवर हल्ले होत आहेत. त्यात अनेक हिंदूंच्या भरदिवसा गोळ्या घालून हत्या होत आहेत. कलम ३७० हटवून उदो उदो करणाऱ्या भाजपाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना हे प्रकरण हाताळता आले नाही. काश्मीरमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले, असून काश्मीर मधील हिंदू दहशतीत जगत आहेत व अनेक हिंदू पुन्हा काश्मीर सोडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. असे असताना देशाचे गृहमंत्री मात्र आयपीलचे क्रिकेट सामने बघण्यात व्यस्त आहेत. स्वत:ला हिंदूचे सरकार म्हणाऱ्या भाजप शासीत सरकारने या होणाऱ्या हल्यांबाबत जनतेला उत्तर द्यावे व तातडीने काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खात्मा करावा, अशा विविध मागण्यांसाठी नाशिकमधील शिवसेना पंचवटी  विभागाच्या वतीने पंचवटी कांरजा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज व अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे।मारून हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी पूर्व विधानसभाप्रमुख योगेश बेलदार, महानगर संघटक दिगंबर मोगरे, विशाल कदम, उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, अमोल सूर्यवंशी, शैलेश सूर्यवंशी, सुनील निरगुडे, शिवसेना महिला आघाडी शोभा मगर, मंगला भास्कर, मनिषा हेकरे, शोभा गटकळ, ज्योती देवरे, संजय थोरवे, महेंद्र बडवे, हर्षद पटेल, युवासेनेचे रूपेश पालकर, वैभव खैरे, संजय पिंगळे , सचिन धोंडगे , बब्बू गोसवी, संदीप लभडे, राहुल देशमुख, पोपट शिंदे, जगन गोरे, युवासेनेचे कल्पेश पिंगळे, महेश मते, प्रमोद घोलप, योगेश गांधी,शोभा दिवे, ज्योती कुमावत,भारती बोढाई आदी शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news