कान्हूर पठार गटात विविध विकासकामे पूर्ण | पुढारी

कान्हूर पठार गटात विविध विकासकामे पूर्ण

कान्हूरपठार : पुढारी वृत्तसेवा

जि. प.च्या माध्यमातून कान्हूर पठार गटात माजी जि. प. सदस्या उज्ज्वला ठुबे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लागली. यापुढील काळातही पठार भागावरील शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुणांसाठी काम करीत राहू, अशी ग्वाही जि. प.चे माजी सदस्य अ‍ॅड.आझाद ठुबे यांनी दिली.

कान्हूरपठार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडीचे लोकार्पण सफाई कामगार नितीन साळवे व राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अ‍ॅड. ठुबे बोलत होते. यावेळी सरपंच गोकूळ काकडे, उपसरपंच सागर व्यवहारे, बापूसाहेब चत्तर, ज्ञानेश्वर पाटील, दर्शन काकडे, विशाल लोंढे, अर्जुन नवले, वैभव साळवे, उमेश घोडके, दत्तात्रय गायकवाड, दिलीप व्यवहारे, छाया दत्तात्रय ठुबे, बेबीताई मगर, नलिनी नवले, सैनिक बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, कान्हूर पठार पतसंस्थेचे उपाध्यक्ष पी. के. ठुबे, सेवा संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल साळवे, विजय काकडे, बबन जोशी, बन्सी ठुबे, भोमा ठुबे, राजेंद्र व्यवहारे, आर. जी. ठुबे, संभाजी पाटील, पांडुरंग ठुबे, बाबासाहेब गुमटकर, किसन सोनावळे, बाबू लोंढे, सखाराम सोनावळे, भगवान शिंदे, स्वप्निल खोडदे, प्रशांत नवले, बाबू जडगुले आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. ठुबे म्हणाले, कान्हूर पठारच्या सर्वागीण विकासासाठी गावचे अंतर्गत रस्ते, शिवार रस्ते जलसंधारणाची कामे, बालवाडी, व्यवहारे मळा, लोंढे मळा रस्ता डांबरीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी आणला. संपूर्ण जि. प. गटात विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळविण्याचा प्रयत्न केला. चौदा व 15 वित्त आयोगातून गावात अनेक विकासकामे झाली आहेत. पाणी निर्जंतूक करण्यासाठी शुद्धीकरण प्रकल्प, तर प्राथमिक शाळेच्या स्वच्छतागृहासाठी 10 लाखांची तरतूद केल्याचे सरपंच काकडे यांनी सांगितले.

 

Back to top button