Nashik : अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेस प्रारंभ

नाशिक : ‘पोएटिक जस्टिस’ एकांकिकेतील एक क्षण. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : ‘पोएटिक जस्टिस’ एकांकिकेतील एक क्षण. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेस सोमवारपासून (दि.24) कालिदास कलामंदिरात सुरुवात झाली. उद्घाटन डॉ. अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले.

यावेळी डॉ. पल्लवी धर्माधिकारी, डॉ. ईश्वरी धर्माधिकारी, अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे, कार्यवाह सुनील ढगे, उपजिल्हाधिकारी गणेश निसाळ तसेच नाट्य परिषदेचे राजेश जाधव, राजेश भुसारे, सुनील प्रभाकर, खजिनदार ईश्वर जगताप, स्पर्धाप्रमुख आनंद जाधव, निवेदक आदिती मोराणकर आदी उपस्थित होते. आभार ईश्वर जगताप यांनी मानले.

स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाकडून प्राजक्त देशमुख लिखित 'पोएटिक जस्टिस' आणि स्वप्नील गायकवाड दिग्दर्शित एकांकिका गुलजार यांच्या 'रावी पार' या कथेवर आधारित ही एकांकिका सादर झाली. भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील वेदना, दुःख, आणि फाळणीचे दुःख हे या एकांकिकेतून दाखवले. यात स्वप्नील गायकवाड, हिरीतीक सम्पाल, किरण सोनवणे, प्रथमेश वाघ, ऋषभ माळी, नरेंद्र पुजारी, प्राजक्ता मेनगर, प्रतीक्षा पाटील, गायत्री नेरपगारे, अनामिका शिंदे, दिनेश, विपुल ढवन, प्रथमेश पाटील, ज्योती नेरपगारे, आर्यन जाधव, आर्या, कोमल मोरे यांनी भूमिका साकारल्या. संगीत संयोजन रोहित सरोदे आणि प्रकाश योजना कृतार्थ कन्सारा यांनी केले. प्राचार्या संपदा हिरे, प्राचार्य बी. एस. जगदाळे, प्रा. प्रवीण जाधव यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news